गुणी व्यक्ती कुठलीही आवाहने लीलया पेलू शकत असल्यामुळे जीवनाकडे अधिक डोळसपणे पाहू शकणे !

हिंदु राष्ट्रात कसे युवक हवेत ?

हे व्यक्तित्व ज्यांनी कमावले आहे, ते युवक राजकारणात शिरले, तरी स्वार्थी असणार नाहीत. त्यांच्या समाजकारणात ढोंग रहाणार नाही. त्यांचे कार्यक्रम हे हवेतले मनोरे ठरणार नाहीत. खर्‍या कळवळ्याने केलेली मानवाची सेवा असे उदात्त स्वरूप त्याला प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही.

हे व्यक्तित्व ज्यांनी कमावले आहे, तो सर्वसामान्य युवकही स्वतःच्या क्षमतेप्रमाणे जीवनाच्या वास्तवाला सामोरा जाईल. स्वतःचे महत्त्व ओळखेल, स्वतःच्या क्षमता जाणून घेईल, स्वतःच्या मर्यादा लक्षात घेईल आणि जीवनाकडे अधिक डोळसपणे पाहू शकेल.

– श्री. रवींद्र परेतकर (संदर्भ : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जानेवारी १९७७)