चोरांच्या आंतरराज्यीय टोळीकडून १३ दुचाकी शासनाधीन
पोलिसांचा धाक नसल्याने गुन्हेगारीत वाढ होत आहे, असे म्हटल्यास चूक ते काय !
सातारा, ४ जून (वार्ता.) – कराड तालुक्यातील दुचाकी चोरीचा एक गुन्हा उघडकीस आल्यानंतर संशयिताकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगली, सातारा जिल्ह्यांतील १३ दुचाकींची चोरी केली असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आंतरराज्य टोळीतील ३ संशयितांना अटक केली आहे. या चोरांनी एक ए.टी.एम्. यंत्र तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. महादेव कोळी (सांगली) किशोर गुजर (गोडोली, सातारा) रोहित देसाई (कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.