पालघर तालुक्यात कोरोनाविषयी जनजागृती करणार्‍या पथकावर गावगुंडांचे आक्रमण !

राज्यात कायदा-सुव्यवस्था नसल्याचेच उदाहरण !

कोरोनाविषयी जनजागृती करणार्‍या पथकावर गावगुंडांनी आक्रमण केले

ठाणे – पालघर तालुक्यातील गांजेढेकाळे आणि जायशेत ग्रामपंचायतीच्या हद्दीतून पालघर जिल्हा परिषदेचा कोरोनाविषयीची जनजागृती करणारा चित्ररथ जात होता. तेथील मद्याच्या नशेत धुंद असलेल्या १० ते १२ गावगुंडांनी रथ थांबवला आणि ‘तुम्ही गावात आलात, तर कोरोना संक्रमण होईल. त्यामुळे गावात जाऊ नका’, असे पथकाला सांगितले. तसेच पथकातील आधुनिक वैद्य, आरोग्य सेवक-सेविका, गट प्रवर्तक, समुदाय आरोग्य अधिकारी आणि वाहनचालक यांच्यावर आक्रमणही केले. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य जण पसार झाले आहेत.