महाराष्ट्र सरकारनियुक्त समितीकडून मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर !
मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे प्रकरण
मुंबई – मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अहवाल देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विधी तज्ञांची समिती नियुक्त केली होती. या समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरील समीक्षा अहवाल ४ जून या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रीमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला आहे.