जळगाव येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. सोहम् उदय बडगुजर (वय ८ वर्षे) याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना लिहिलेले कृतज्ञतापत्र !
प्रत्येक जिवाला साधनेची गोडी लावणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सोहम् बडगुजर हा एक आहे.
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
(‘वर्ष २०१८ मध्ये कु. सोहम् याची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती.’ – संकलक)
प.पू. डॉक्टरआजोबांच्या चरणी,
साष्टांग नमस्कार.
परम पूज्य, मी जेवतांना, खेळतांना प्रत्येक क्षणी तुम्ही माझ्या समवेत असता. त्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळतो. परम पूज्य, ‘तुम्ही मला साधकांचा सहवास सतत मिळावा’, यासाठी जे नियोजन केले आहेे’, त्यासाठी मी पुष्कळ कृतज्ञ आहे.
परम पूज्य, तुम्हीच माझ्यातील स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या. माझ्यामध्ये व्यष्टी आणि समष्टी साधना या दोन्हींची तळमळ निर्माण करा. माझ्याकडून प्रत्येक क्षणी तुम्ही साधना करवून घ्या. माझ्या मनातील सर्व अयोग्य विचार घालवून मला सतत तुमच्या अनुसंधानात ठेवा.
परम पूज्य, ‘ज्या वेळी मला झोप येत नाही, तेव्हा तुम्ही मला तुमच्या कुशीत घेऊन झोपवता’, अशी मला अनुभूती येते. त्यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. तुम्ही सूक्ष्मातून सतत माझ्या समवेत रहाता. मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे. मी प्रत्येक रात्री ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचे दर्शन घेतो आणि तो ग्रंथ समवेत घेऊन झोपतो. तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! प.पू. डॉक्टरआजोबांच्या चरणी वंदन !
– कु. सोहम् उदय बडगुजर (वय ८ वर्षे), जळगाव (१२.८.२०२०)
|