सांगली येथील साधिकेला कोरोनाचा संसर्ग झालेला असतांना खासगी रुग्णालयाविषयी आलेला चांगला अनुभव
मला कोरोना झाला आहे, हे समजल्यावर पुष्कळ घाबरून गेले होते. मला पुष्कळ अशक्तपणा आला होता. त्यामुळे दोन पावले चालणेही शक्य नव्हते. आमच्याच गावातील ओम श्री रुग्णालयात मला भरती करण्यात आले. तिथे गेल्यावर परिचारकांनी पुष्कळ मानसिक आधार दिला आणि सतत आपलेपणाने विचारपूस केली. त्यांनी मला वेळेत औषधे आणि इंजेक्शन्स् देण्यासह वेळोवेळी रक्तदाब अन् ऑक्सिजन यांची तपासणी केली. रुग्णालयात स्वच्छताही चांगली होती. ही सर्व केवळ गुरुकृपा आहे. मी रुग्णालयात जातांना ‘आश्रमात चालले आहे’, असा भाव ठेवला होता. त्यामुळे मला त्रास होत असतांनाही त्याचा परिणाम अल्प जाणवला आणि मी कोरोनामुक्त होऊन लवकर घरी परत आले. केवळ गुरुकृपेने मला लवकर तिथून बाहेर पडता आले. यासाठी श्रीगुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञता !
– सौ. जयश्री वेदपाठक, विटा, सांगली.
कोरोनाच्या काळात आलेले चांगले अनुभव त्वरित कळवा !आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org |