पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
उपचारासाठी आयुर्वेदीय केंद्रात पाठवण्याविषयी राजस्थान सरकारला नोटीस
नवी देहली – जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची जामिनासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्याच वेळी त्यांना उपचारासाठी राजस्थानबाहेर किंवा आयुर्वेदीय उपचार केंद्रात पाठवण्याची मागणी करणार्या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने सहमती दर्शवली. यासंदर्भात न्यायालयाने राजस्थान सरकारला नोटीस पाठवली आहे. एका आठवड्यात यावर उत्तर देण्यास सांगितले आहे. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी नुकतीच कोरोनावर मात केली; मात्र त्यांची प्रकृती चांगली नसल्याने त्यांनी आयुर्वेद उपचार घेण्याची मागणी केली आहे.
Supreme Court rejects Asaram Bapu bail plea to seek treatment for Covid https://t.co/OhyVkbm1On
— India Legal (@indialegalmedia) June 4, 2021