सातारा येथे डांबून ठेवलेल्या ६ गोवंशियांची सुटका, धर्मांधाला अटक
गोवंशीय हत्याबंदी कायद्याला धाब्यावर बसवणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील !
सातारा, ४ जून (वार्ता.) – येथील गुरुवार परज येथे लहान ६ गोवंशीय (वासरे) डांबून ठेवल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गोवंशियांची सुटका केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.
इक्बाल आदम शेख यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. गुरुवार परजावर जनावरांचा मोठ्याने आरडा-ओरडा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस गुरुवार परज येथे आले. त्यांना जनावरे ओरडत असल्याचे ऐकू आले. आजूबाजूला शोध घेतला असता एका शेडमध्ये क्रूरपणे ६ लहान वासरे डांबून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तिथेच असलेल्या इक्बाल शेख यांना पोलिसांनी काही प्रश्न विचारले; मात्र समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. पोलिसांनी कारवाईचा धाक दाखवताच शेख यांनी बोलण्यास प्रारंभ केला. पोलिसांनी वासरांना सुरक्षित स्थळी हालवले आहे.