शिरसाई योजनेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया !
योजनेच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न देणाऱ्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. आपत्काळामध्ये पाण्याचा असा अपव्यय होण्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना काढणे आवश्यक !
बारामती – कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सिद्ध करण्यात आलेली शिरसाई उपसा सिंचन योजनेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. शिर्सुफळ गावातील म्हात्रे वस्तीतील अनेक घरात आणि शेतात पाणी शिरले. गेल्या अनेक वर्षांपासून योजनेच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सौजन्य : News18 Lokmat
वाहिनीच्या आतील भागात वर्ष २०१७ मध्ये रंगकाम करण्यासाठी शिर्सुफळ येथे वाहिनीला छेद दिला होता. याच ठिकाणी गंज लागुन वाहिनी फुटली. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून प्रशासन काम करत असल्याचे शिरसाई उपसा सिंचन योजनेचे उपअभियंता रंगनाथ भुजबळ यांनी सांगितले.