बाणेर येथील जम्बो रुग्णालयाला ३ मास मुदतवाढ !
पुणे – शहरातील रुग्णसंख्या अल्प होत असली तरी बाणेर येथे सध्या कार्यान्वित असलेल्या जम्बो रुग्णालयाला आगामी काळातील आवश्यकता लक्षात घेऊन ३ मास मुदतवाढ दिली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने ७५ कोटी रुपयांच्या व्ययाला मान्यता दिली असल्याचे समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बाणेर येथील नव्या कोविड रुग्णालयासाठी १३० खाटा खरेदी करण्यासाठी इमर्सन एक्सपोर्ट्स या आस्थापनाकडून सी.एस्.आर्. अंतर्गत मिळालेल्या निधीलाही मान्यता दिली आहे. दीड ते दोन मासात हे रुग्णालय उभारण्यात येईल, असेही रासने यांनी सांगितले.