पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम !
पुणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम असल्याने बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना आर.टी.पी.सी.आर. चाचणी करणे बंधनकारक असून त्याचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवावा लागणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णांच्या पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या भागातील निर्बंध कायम ठेवले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.