३० सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथे पोलिसावर गुन्हा नोंद !
सोलापूर – वाळू तस्करी करतांना पकडल्याने कारवाई होऊ नये, तसेच नियमित वाळू तस्करीला पाठिंबा द्यावा यासाठी ३० सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संतोष चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. (अशा लाचखोर पोलिसांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)
याविषयी देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वाळू तस्करी करतांना तक्रारदाराचे वाहन पकडण्यात आले होते. त्यावर कारवाई न करण्यासाठी, तसेच पुढेही वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष करावे यासाठी पोलीस संतोष चव्हाण याने ३० सहस्र रुपयांची लाच मागितली. ‘ही लाच साहेबांना द्यावी लागणार आहे’, असे चव्हाण याने सांगितले होते.