आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या निधीतून सांगलीच्या शासकीय रुग्णालयास सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान !
सांगली, ३ जून – भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या निधीतून सांगलीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयास सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. या वेळी आमदार गाडगीळ यांच्या हस्ते रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी प्रदान करण्यात आली.
आमदार गाडगीळ म्हणाले, ‘‘आमदार फंडातून २ रुग्णवाहिका खरेदी केल्या असून त्यातील एक महानगरपालिकेच्या कुपवाड विभागास दिली आहे, तर दुसरी शासकीय रुग्णालयास प्रदान करण्यात आली. शासकीय रुग्णलयातील रुग्णवाहिका १७ वर्षे जुनी होती.’’ या वेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, भाजप संघटक सरचिटणीस दीपक माने यांच्यासह अन्य उपस्थित होते.