ओझे अल्प करायचे आहे ।
‘पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. मनीषा महेश पाठक यांनी ‘स्वत:चे ओझे न्यून करायचे आहे. सर्व जुने प्रसंग आणि पूर्वग्रह काढायचा आहे’, असे सांगितल्यावर मला सुचलेली कविता येथे दिली आहे.
मनाचे मळभ
काढायचे आहे ।
गुरूंना शरण
जायचे आहे ।। १ ।।
भूतकाळातील
प्रसंग आहेत विसरायचे ।
वर्तमानकाळात
आहे रहायचे ।। २ ।।
आपुले आपण
हसायचे आहे ।
देवाचे लाडके बनायचे आहे ।। ३ ।।
जन्मोजन्मीचे संस्कार घालवून घडायचे आहे ।
प्रक्रिया करून मनाला घडवायचे आहे ।। ४ ।।
‘मी कोण आहे ?’, हे विसरायचे आहे ।
जिवाला शिवाशी भेटवायचे आहे ।। ५ ।।
अस्तित्व स्वतःचे विसरायचे आहे ।
गुरुचरणी एकरूप व्हायचे आहे ।। ६ ।।’
– सौ. कविता बेलसरे, पुणे (४.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |