कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस !
कोल्हापूर, ३ जून – दुपारपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. बेळगावातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथे पोल्ट्रीची भिंत कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. पावसापासून आडोसा घेण्यासाठी थांबले होते. त्याच कालावधीत अचानक भिंत कोसळली आणि ढिगार्याखाली अडकून त्यांचा मृत्यू झाला.