अवतरले महाविष्णु भगवान या कलियुगी ।
विष्णुजागृती सोहळ्यातून साधकांना आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
अवतरले महाविष्णु भगवान या कलियुगी ।
भक्तांच्या उद्धारासाठी ।
अवतरले महाविष्णु भगवान या कलियुगी ।
भक्तांच्या (टीप १) कल्याणा ।
सत्वर धावून येती ।। १ ।।
भक्तांच्या हाकेला ।
धावून येशील नारायणा ।
विष्णुदेवा, तुझी लेकरे (टीप २) ।
आतुरली येण्या तव चरणा ।। २ ।।
घे या लेकरांना तुझ्या चरणांशी ।
भव्य सोहळा अनुभवला । रामनाथीच्या वैकुंठी ।। ३ ।।
चैतन्याच्या प्रवाहात । साधकांना न्हाऊ घातले ।
व्यष्टी अन् समष्टी साधनेतून । आम्हास घडवले ।
कलियुगी दिली आम्हास । अनुभूती श्रीविष्णुतत्त्वाची ।। ४ ।।
टीप १ – साधकांच्या
टीप २ – साधक
– श्रीमती उषा बडगुजर, जळगाव (१२.१२.२०१९)
या लेखात कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |