भारतात डिसेंबर २०२१ पर्यंत लसीकरण पूर्ण करणार ! – केंद्रशासन

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – भारतात डिसेंबर २०२१ पर्यंत कोरोनावरील लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास आय.सी.एम्.आर्.ने मुंबई उच्च न्यायालयात व्यक्त केला आहे. जुलै मासापासून देशात प्रतीमहा ‘कोवॅक्सिन’च्या साडेपाच कोटी, तर ‘कोविशिल्ड’च्या २ कोटी लसी उपलब्ध होतील, अशी माहितीही केंद्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

देशातील प्रत्येक नागरिकाला लसीचा किमान पहिला डोस कधीपर्यंत उपलब्ध होईल, अशी माहिती न्यायालयाने विचारली असता केंद्रशासनाने वरील उत्तर दिले. केंद्रशासनला यासंदर्भात ८ जूनपर्यंत सविस्तर भूमिका मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुंबई महापालिकेने जे घरात अंथरुणाला खिळून आहेत, त्यांच्या घरी जाऊन त्यांचे लसीकरण करावे, अशी सूचना केली.