सरकारी रुग्णालयाच्या संदर्भात आलेला चांगला अनुभव !

प्रतिकात्मक छायाचित्र

१९ एप्रिल २०२१ या दिवशी माझे यजमान श्री. रजनीकांत राजाराम मोरे (वय ४० वर्षे) आणि सासरे श्री. राजाराम महादेव मोरे (वय ७९ वर्षे) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजले. ४ दिवसांनी मी आणि माझा मोठा मुलगा यशराज मोरे (वय १७ वर्षे) आम्हालाही कोरोनाचा संसर्ग झाला. सर्वांचीच मनःस्थिती पुष्कळ अस्वस्थ होती. आम्ही भयभीत झालो होतो; कारण यजमानांना कोरोनामुळे पुष्कळ त्रास होत होता. त्यांची स्थिती पुष्कळ बिघडली होती. आमच्या कौटुंबिक आधुनिक वैद्यांनी (अतुल मोरे यांनी) यजमानांना सरकारी रुग्णालयात भरती करण्यास सांगितले. तेथे त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार झाले. तेथे अल्पाहार आणि जेवण यांची उत्तम सोय होती. औषधोपचारांसाठी अनावश्यक व्यय अजिबात झाला नाही. खासगी रुग्णालयामध्ये किमान ३ लाख तरी व्यय आला असता; पण कौटुंबिय आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यामुळे आम्हाला उपचारांची योग्य दिशा मिळाली आणि योग्य ते उपचार झाले. हे केवळ आणि केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच होऊ शकले, त्याविषयी गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

– सौ. सुरेखा रजनीकांत मोरे, ईश्वरपूर, सांगली

कोरोनाच्या काळात आलेले चांगले अनुभव त्वरित कळवा !

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org