कानपूर येथे सराईत गुंडाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या तावडीतून सोडवून पळू जाऊ दिले !
उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम सत्ताधारी पक्षाचे आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील उस्मानपूरमध्ये भाजपचे दक्षिण जिल्हा मंत्री नारायण सिंह भदौरिया यांच्या वाढदिवसाच्या मेजवानीला उपस्थित राहिलेला सराईत गुंड मनोज सिंह याला पोलीस पकडण्यास आले होते. पोलिसांनी मनोज सिंह याला पकडून जीपमध्ये बसवल्यावर येथे उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी नारायण भदौरिया यांच्या आदेशाने पोलिसांवर आक्रमण केले. त्यांनी मनोज सिंह याला त्यांच्या तावडीतून सोडवले आणि पळू जाऊ दिल्याची घटना समोर आली आहे. या वेळी पोलीस केवळ मूकदर्शक बनून राहिले. मनोज सिंह याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, लुटमार, बलात्कार आदी गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याला पळू जाण्यास देणारे भाजपचे नेते नारायण भदौरिया यांच्यावर कलम ३०७ आणि ३०८ अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.