पेटा संस्थेवर भारतात बंदी घाला ! – अमूल आस्थापनाची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्र लिहून मागणी
पेटा भारतातील दुग्ध व्यवसाय नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप
पेटा सारख्या संस्था भारतविरोधी कारवाया करत असतील, तर त्यांच्यावर सरकारने स्वतःहून बंदी घातली पाहिजे ! पेटासारख्या प्राणीरक्षक संस्था बकरी ईदच्या दिवशी गायब असतात, हे जगजाहीर आहे !
नवी देहली – अमूल या भारतातील दुग्ध व्यवसाय करणार्या आस्थापनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांच्याकडे पेटा (पीपल ऑफ द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल) या प्राणीरक्षक संघटेनवर भारतात बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Amul Vice-Chairman Valamji Humbal urges PM Modi to ban PETA; alleges a ‘foreign conspiracy’https://t.co/FH9cu166CN
— Republic (@republic) June 3, 2021
अमूलचे उपाध्यक्ष वलमजी हंबल यांनी आरोप केला आहे की, पेटा संस्था लोकांची उपजीविका नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्यामुळे भारतातील दुग्ध उद्योगक्षेत्राची प्रतिमा अपकीर्त होत आहे. पेटाच्या कारवायांमुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. पेटाकडून दूध उत्पादकांना बेरोजगार करण्याचा प्रयत्न होत आहे. पेटासारख्या संस्था सिंथेटिक दुधाचे उत्पादन करणार्या बहुराष्ट्र्रीय आस्थापनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारतात पशूच्या संदर्भात हिंसा केली जात असल्याच्या अफवा पसरवण्यात येत आहेत. उलट भारतात पशूंना कुटुंबातील एक सदस्य म्हणून पाहिले जाते.
अमूलने वीगल दुधाचे उत्पादन वाढवावे ! – पेटा
पेटा इंडिया संस्थेने अमूलला वीगल म्हणजे प्राण्यापासून उत्पादित नसलेल्या दुधाचे उत्पादन करण्याचे आवाहन केले होते. यात वनस्पतीद्वारे दूध उत्पादित करण्यात येते.