गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तरी ती अल्पच ।
साधकांना मोक्षप्राप्तीची वाट दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मिळाला दैवी बालकांना जन्म ।
पृथ्वीवर रामनाथीमध्ये बनवला वैकुंठ लोक ।। १ ।।
त्याच वैकुंठात रहाते माझी गुरुमाऊली आणि संत ।
कलियुगात दाखवूनी सर्व साधकांना साधनामार्ग ।। २।।
गुरुमाऊली हे साक्षात् श्रीहरीचे रूप ।
पृथ्वीवर येऊनी साधकांना बनवले संत ।। ३।।
वाट दाखवूनी आम्हास मोक्षप्राप्ती करण्यासाठी ।
आणि करण्यास सांगती ईश्वरप्राप्ती ।। ४ ।।
साधकांतून घडवले आता शंभरहून अधिक संत ।
गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तरी ती अल्पच ।। ५ ।।
‘हे गुरुमाऊली, ‘तुम्हीच ही कविता सुचवलीत आणि लिहून घेतलीत’, त्यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. जागृती महादेव होनमोरे (वय १२ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |