यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार ! – हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री
मुंबई – यापुढे ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद यांमध्ये ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा केला जाईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करावे. त्यानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गायन करावे, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून हा राज्याभिषेक दिन हा संपूर्ण राज्यात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. https://t.co/MguxWra6Qm
— Saamana (@SaamanaOnline) June 2, 2021