तिसर्या लाटेसाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ! – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
सोलापूर – जिह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. तिसर्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक प्रादुर्भाव होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. आता आम्ही कोरोनाच्या तिसर्या लाटेची पूर्वसिद्धता करत आहोत, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख ३१ मे या दिवशी सोलापूर येथे आले होते. त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन तिसर्या लाटेच्या पूर्वसिद्धतेचा आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले की, सोलापूर शहर आणि जिह्यात बालरोगतज्ञांची समिती स्थापन केली आहे. उपचारासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, औषधे यांची सिद्धता केली आहे. लसीकरणालाही गती देण्यात आली आहे; मात्र लसीचा पुरवठा म्हणावा तसा होत नाही. यावर उपाय काढण्याचा प्रयत्न चालू आहे. दुसर्या लाटेत लसीकरण पूर्ण झाले असते, तर तिसर्या लाटेचे संकट टाळता आले असते.