लसीकरण करणार्या पंचतारांकित उपाहारगृहावर मुंबई महापौरांची धाड !
मुंबई – ‘द ललित’ या पंचतारांकित उपाहारगृहात चालू असलेल्या लसीकरण मोहिमेच्या वेळी महापौर डॉ. किशोरी पेडणेकर यांनी अचानक भेट दिली. तेथे लसीकरणाच्या नियमांचे पालन होत नसल्याने त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. लस ठेवण्यासाठी असलेल्या शीतपेट्यांचे परीक्षण न होणे, लसी ठेवण्यासाठी घरगुती शीतकपाटाचा वापर करणे, तसेच ‘आईस बॅग’ म्हणून पाण्याच्या बाटल्यांचा वापर करणे, असे प्रकार महापौरांच्या निदर्शनास आले.
Mumbai mayor finds COVID-19 vaccines stored in normal fridge at hotel #Mumbai #COVID19 #coronavirus #CoronavirusVaccine https://t.co/tEj7AgyPjy
— India TV (@indiatvnews) May 30, 2021