हिंगोली येथे ४६० पोती गहू काळ्या बाजारात नेणार्या दोघांना अटक !
पोलिसांकडून १७ लाख रुपयांचा माल जप्त !
धान्याचा काळाबाजार करून सामान्यांची लुबाडणूक करणार्यांना कठोर शासन केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
हिंगोली – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील स्वस्त धान्य दुकानातील ४६० पोती असलेल्या गव्हाचा ट्रक काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना पकडला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात १ जूनच्या रात्री सोनपेठ (जिल्हा परभणी) येथील ट्रकचालक शेख अब्दुल्ला शेख हैदर, सय्यद अजिम सय्यद कलीम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाशीम येथून हा गहू भाग्यनगर (हैदराबाद) येथे जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी ५ लाख रुपये किंमतीचा गहू आणि १२ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण १७ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.