इराणची सर्वांत मोठी युद्धनौका आग लागून समुद्रात बुडाली !

‘खर्ग’ युद्धनौकेला लागलेली प्रचंड आग

तेहरान (इराण) – ओमानच्या समुद्रकिनार्‍याजवळ तैनात असलेली इराणची सर्वांत मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या आग लागून बुडाली आहे. ही आग इतकी प्रचंड होती की, ती अंतराळातूनही दिसत होती. या युद्धनौकेचे नाव ‘खर्ग’ होते. युद्धनौकेला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. नौकेवरील सर्व कर्मचार्‍यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अग्नीशमन दलाने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र २० घंट्यांच्या प्रयत्नानंतरही ही नौका येथील जस्क बंदराजवळ बुडाली. ही युद्धनौका इराणने ब्रिटनकडून वर्ष १९८४ मध्ये विकत घेतली होती. ब्रिटनने ही युद्धनौका वर्ष १९७७ मध्ये बनवली होती.