जयपूर (राजस्थान) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करून मुसलमान समाजसेवकाच्या अंत्यसंस्काराला १५ सहस्रांहून अधिक लोकांची उपस्थिती !
|
|
जयपूर (राजस्थान) – येथील समाजसेवक हाजी रफअत अली यांच्या अंत्यसंस्कारला सहस्रो लोकांनी सहभागी होऊन कोरोना नियमांचे उल्लंघन केले. या लोकांनी मास्क घातला नव्हता आणि सामाजिक अंतरही राखले नव्हते. पोलिसांनी या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्यास धन्यता मानली. सत्ताधारी काँग्रेसचे २ नेतेही या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झाले होते. या घटनेचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. पोलिसांनी कारवाई केल्याचे दाखवण्यासाठी येथील आमदार रफीक खान यांच्यासह अनेकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
#Rajasthan: Violating #COVID19 guidelines, hundreds gather for funeral procession; cases registered against 11 including Congress MLA Rafeek Khan@RafeekKhanInc @ManishGodha16 https://t.co/nsMaNT4vsF
— Free Press Journal (@fpjindia) June 1, 2021
१. यपूर्वी राज्यातील जैसलमेर येथे राज्यमंत्री सालेह महंमद यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या अंत्यसंस्कारालाही ५ सहस्रांपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. तेव्हाही पोलीस निष्क्रीय होते. याच दिवशी राज्यातील धौलपूर येथे भाजपचे आमदार सुखराम खोली यांनी हनुमान मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेनंतर अखंड रामायणाचे पारायण ठेवले होते. त्यात ५०० हून अधिक लोक सहभागी झाल होते. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना सर्वांसमोर फटकारले होते. (मुख्यमंत्र्यांचा दुटप्पीपणा यातून दिसून येतो ! – संपादक)
२. १७ मेपर्यंत पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणार्यांकडून २१ लाख ५१ सहस्र रुपये दंड म्हणून जमा केले होते.