सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या घडामोडी
|
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाला १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद रहातील, असा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या आदेशातील अन्य सूत्रे
१. १ जूनपासून १५ जून २०२१ पर्यंत अन्य जिल्ह्यांतून अथवा राज्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहतूक करण्यास अनुमती असणार नाही. तथापि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, वैद्यकीय कारणाकरता प्रवास, अत्यावश्यक अथवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, तसेच कोरोनाशी संबंधित व्यक्तींना यामधून सवलत देण्यात आली आहे.
२. कार्गो वाहतुकीद्वारे दुकाने अथवा आस्थापने यांच्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत; मात्र दुकानदारांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर वस्तूंची विक्री ग्राहकांना करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास संबंधित दुकान कोरोनाची साथ संपेपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच अशा दुकानदारांकडून दंडही आकारण्यात येईल.
३. वरील आदेशाचे पालन न व्यक्ती अथवा संस्था यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत २० सहस्र ४६२ रुग्ण कोरोनामुक्त
१. कोरोनाचे नवीन रुग्ण ५५०
२. २४ घंट्यांत मृत्यू झालेले रुग्ण ७
३. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ६९४
४. उपचार चालू असलेले रुग्ण ५ सहस्र ९२०
५. बरे झालेले एकूण रुग्ण २० सहस्र ४६२
६. आतापर्यंतचे एकूण रुग्ण २७ सहस्र ८२