अभिनेत्री जुही चावला यांच्याकडून ‘५ जी’ तंत्रज्ञान लागू करण्याच्या विरोधात याचिका प्रविष्ट

जुही चावला

मुंबई – अभिनेत्री जुही चावला यांनी ‘५ जी’ तंत्रज्ञान भारतात लागू करण्याच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. जुही चावला या मागील अनेक वर्षांपासून भ्रमणभाषच्या मनोर्‍यांमधून (‘टॉवर’मधून) निघणार्‍या हानीकारक किरणांविषयी (‘रेडिएशन’विषयी) नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत.

त्यांनी याचिकेत मागणी केली आहे की, ‘५ जी’ तंत्रज्ञान लागू करण्याआधी त्याच्याशी संबंधित सामान्य जनता, जिवाणू, झाडे-झुडपे आणि पर्यावरण यांवर होणार्‍या परिणामांचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्या दृष्टीने अहवाल सिद्ध करून त्या आधारावर ते तंत्रज्ञान भारतात लागू करायचे कि नाही, याविषयी निर्णय घ्यावा.

जुही चावला यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये सांगितले की, मी अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्याच्या विरोधात नाही; परंतु त्या माध्यमातून येणारे किरण हे नागरिकांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षा यांच्या दृष्टीने अतिशय हानीकारक आहेत.