सलग ४ वर्षे होत आहे अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती !
पुणे – अरबी समुद्रात गेल्या ४ वर्षात मॉन्सूनपूर्व हंगामात चक्रीवादळांची निर्मिती होत आहे. हवामान बदल, समुद्राचे वाढते तापमान आणि हवेतील धूलिकण ( एरोसोल ) याला कारणीभूत असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले आहे. अरबी समुद्रातील वाढते तापमान, गुप्त उष्णता आणि वाऱ्याच्या माध्यमातून वाहणारे धूलिकण, ब्लॅक कार्बन आणि बाष्पीकरण या गोष्टी चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी पोषक ठरत असून वादळी वाऱ्यांमुळे नुकसानीच्या घटना वाढल्या असल्याचे ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले, तर हवामान बदलामुळे चक्रीवादळ निर्माण होत आहे का ? यासाठी पुढील काही काळ अभ्यास करणे आवश्यक असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. शिवानंद यांनी सांगितले.