वर्धा येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नीलेश देशमुख यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक !
वर्धा – येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नीलेश देशमुख यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. जिल्ह्यातील आर्वी ते कौंडण्यापूर रस्त्याचे काम करणार्या अमरावती येथील ‘शैलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम चालू असतांना ३० मे या दिवशी नीलेश देशमुख यांनी ४ डंपर अडवले, हा रस्ता मी संमत करून आणला आहे. यामुळे मला एक लाख रुपये दिल्याविना तुम्हाला काम करता येणार नाही’, असे म्हणत शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.