कोयना धरणात केवळ २९.१९ ‘टी.एम्.सी.’ पाणीसाठा
सांगली, १ जून – सातारा, सांगली या दोन जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण असणार्या कोयना धरणात सध्या केवळ २९.१९ ‘टि.एम्.सी.’ (साठा क्षमता १०५.२५ ‘टी.एम्.सी.’) पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणातीलच पाण्यावर अवलंबून असणार्या कृष्णा नदीने सांगलीत पाण्याचा तळ गाठला असून आयर्विन पूल येथे पाणीपातळी केवळ १० फूट आहे. सर्वजण आता पावसाच्या प्रतिक्षेत असून येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास गंभीर पाणी संकटाला सामोरे जावे लागू शकते. याच समवेत वारणा धरणात १४.३१ ‘टी.एम्.सी.’ इतका पाणीसाठा आहे.