परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ‘छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथा’ची सेवा करण्याची सुवर्णसंधी !
साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक यांना विनंती
‘सध्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन : खंड ५’ या ग्रंथाची सेवा चालू आहे. साधकांसाठी अमृततुल्य आणि आपत्काळातील संजीवनी असलेल्या या ग्रंथासाठी १५० हून अधिक छायाचित्रांमध्ये सात्त्विकतेच्या दृष्टीने संगणकीय सुधारणा करायच्या आहेत. ही सेवा जून ते ऑगस्ट २०२१ असे ३ मास (महिने) अविरत चालू असेल.
रामनाथी आश्रमात राहून ही सेवा करण्याची इच्छा असलेले आणि ‘फोटोशॉप’ ही संगणकीय प्रणाली शिकणारे अन् ती उत्तम प्रकारे हाताळता येऊ शकणारे साधक जिल्हासेवकांच्या माध्यमातून या सेवेसाठी तातडीने संपर्क करू शकतात. जिल्हासेवकांनीही आपल्या जिल्ह्यातील, विशेषतः तरुण साधक-साधिकांपैकी वरील सेवा कोण करू शकतील, याचा विचार करून त्या साधक-साधिकांच्या अनुमतीने त्यांचीही नावे कळवावीत.
संपर्कासाठी इ-मेल पत्ता
सौ. भाग्यश्री सावंत : भ्रमणभाष क्र. ७०५८८८५६१०,
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा पिन – ४०३४०१