परदेशात उच्चशिक्षणासाठी जाऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आज विशेष लसीकरण !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई – परदेशातील विद्यापिठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी १ जून या दिवशी विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सेक्टर १५ नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय येथे लसीकरण होणार आहे.

१८ ते ४४ वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी येतांना परदेशी विद्यापिठात प्रवेश मिळाल्याचे निश्‍चिती पत्र, परदेशी व्हिसा आणि व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेली कागदपत्रे आणणे बंधनकारक आहे.