मन माझे गुंतले देवाजीच्या चरणा ।
देहाच्या मंदिरा कृष्ण सख्या सावळ्या ।
मन माझे गुंतले, देवाजीच्या चरणा ।। १ ।।
रूप तुझे सावळे दीनांच्या देवा ।
डोळे सुखावून आनंद जाहला, अनाथांच्या नाथा ।। २ ।।
रूप तुझे सावळे आनंदाच्या कंदा ।
नाम तुझे घेता, होई मज परमानंदा ।। ३ ।।
तूच माझा सखा दुजा नसे कुणी ।
अनाथांच्या नाथा, देह वाहिला रे तुला ।। ४ ।।
– श्री. सुधाकर केशव जोशी (वय ९१ वर्षे, ६१ टक्के आध्यात्मिक पातळी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |