लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि प्रकाशक यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करावा !
|
ठाणे, ३१ मे (वार्ता.) – लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकामध्ये ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या आई सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळींना ठार केले’, असे कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक पुरावा नसलेले खोटे लिखाण केले आहे. कुबेर यांनी समाज-जाती यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी या पुस्तकावर बंदी घालून गिरीश कुबेर आणि पुस्तकाचे प्रकाशक यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करावा, अशी मागणी अंबरनाथ आणि बदलापूर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या युवा विभागाने तहसीलदारांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या युवा विभागाचे अंबरनाथ आणि बदलापूरचे कार्यकर्ते नरेश चव्हाण, विकी चव्हाण, अमित जमदाडे, सिद्धी साळवी, अमित पाटील, प्रथमेश मुदलियार आदी उपस्थित होते.