अहिल्यादेवींनी अनेक ठिकाणी घाट, मंदिरे, धर्मशाळा उभारून सर्वसामान्य जनतेला आधार दिला ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप
सांगली भाजपच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
सांगली, ३१ मे (वार्ता.) – अनेक कौटुंबिक आघात होऊनही अहिल्यादेवींनी प्रजेप्रती असलेल्या निष्ठेने सारी दु:खे बाजूला सारत राज्यकारभार उत्तमरीतीने पार पाडला. परमेश्वरावरील प्रगाढ भक्तीमुळे अनेक ठिकाणी घाट, मंदिरे, धर्मशाळा उभारून सर्वसामान्य जनतेला आधार दिला. या निश्चयी स्वभावामुळे अहिल्यादेवींनी त्यांचे पूजनीय स्थान प्रत्येक भारतियाच्या मनात उभे केले आहे, असे विचार भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यालयात अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यावर ते बोलत होते. यानंतर विजयनगर येथील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी युवा मोर्चा अध्यक्ष श्री. धीरज सूर्यवंशी, महिला मोर्चा अध्यक्षा (सौ.) स्वाती शिंदे, नगरसेवक श्री. संजय यमगर, सर्वश्री विष्णू माने, राजू कुंभार, गजानन आलदर, नगरसेविका सौ. उर्मिलाताई बेलवलकर, कल्पनाताई कोळेकर, सविताताई मदने, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. अमर पडळकर यांसह अन्य उपस्थित होते.