सैफई (उत्तरप्रदेश) येथे मद्य विक्रीच्या दुकानांबाहेर ‘लस घेतलेल्यांनाच दारू मिळणार’ अशी सूचना !
‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असा हा प्रकार होय ! त्यापेक्षा मद्याची दुकानेच बंद केली, तर बर्याच समस्या सुटतील, हे प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ?
सैफई (उत्तरप्रदेश) – येथे मद्याच्या दुकानांबाहेर ‘लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नसेल, तर दारू मिळणार नाही’, अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमकुमार सिंह यांच्या निर्देशानुसार दुकानांबाहेर अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. अलीगड येथे विषारी दारूच्या सेवनामुळे मद्यपींचा बळी गेल्यानंतर ही सूचना देण्यात आली आहे. मे मासाच्या प्रारंभी अलीगडमध्ये विषारी दारू पिऊन २५ जणांचा मृत्यू झाला होता.
Uttar Pradesh: Liquor sellers display ‘no alcohol without vaccine certificate’ to promote vaccinationhttps://t.co/pjIERyErCF
— OpIndia.com (@OpIndia_com) May 31, 2021