कोरोना लस भरलेल्या सीरिंज फेकून देणार्या आरोग्य कर्मचारी नेहा खान यांच्यावर गुन्हा नोंद
यालाही आता ‘जिहाद’ म्हणायचे का ?
अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील जमालपूरच्या शहर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कचरापेटीमध्ये कोरोना लस भरलेल्या २९ सीरिंज सापडल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी येथील लसीकरण विभागाच्या प्रमुख असणार्या नेहा खान यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसेच या प्रकरणी चौकशीसाठी २ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आल्यानंतर समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे.
Aligarh empty vaccine case: Initial investigation reveals nurse Niha Khan had criminal mindset, could hamper vaccination drive. Details https://t.co/tmJjx3CwL7
— OpIndia.com (@OpIndia_com) May 31, 2021
या केंद्रातील नेहा खान यांच्या सहकार्यांनी सांगितले की, नेहा खान लस भरलेल्या सीरिंज केवळ लोकांच्या हाताला टोचत होती; मात्र लस देत नव्हती आणि नंतर लस भरलेल्या सीरिंज टाकून देत होती. याविषयी तिला विचारले असता ‘माझा मुड चांगला नाही’ असे सांगत ती निघून गेली. (अशा ‘मुडी’ आरोग्य कर्मचार्यांना सरकारने बाहेरचा रस्ता दाखवणे अपेक्षित आहे ! – संपादक) तोपर्यंत २९ सीरिंज फेकून देण्यात आल्या होत्या.