कोरोनामुळे मृत पावलेल्या ६७ पत्रकारांच्या कुटुंबांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य
नवी देहली – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना पत्रकार कल्याण योजनेच्या अंतर्गत साहाय्य देण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे मंत्रालय आणि पत्र सूचना कार्यालय यांनी वर्ष २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांची सविस्तर माहिती गोळा केली असून त्यांना या योजनेंतर्गत साहाय्य दिले जाणार आहे.
26 families of journalists who died of Covid will get Rs 5 lakh financial assistance: Govthttps://t.co/1p1SlNNBfq
— India TV (@indiatvnews) May 27, 2021
कोरोनामुळे मृत झालेल्या २६ पत्रकारांच्या कुटुंबांना या योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याच्या प्रस्तावाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली. आतापर्यंत ६७ कुटुंबांना साहाय्य देण्यास संमती देण्यात आली आहे.
पत्रकार कल्याण समिती अंतर्गत पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय आर्थिक साहाय्यासाठी पत्र सूचना कार्यालयाचे संकेतस्थळ accreditation.pib.gov.in/jws/default.aspx च्या माध्यमातून अर्ज करू शकतात.