लहान मुलांना स्थानिक प्रशासनासह महिला आणि बाल कल्याण विभागाने विनामूल्य मास्क द्यावेत ! – महेश गावडे, अध्यक्ष, समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था
कोल्हापूर – कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना लक्ष्य करणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असतांना शहर परिसर, ग्रामीण भागात लहान मुले विनामास्क वावरत आहेत. याला त्यांचे पालकच उत्तरदायी आहेत. लहान मुलांची काळजी घेणे याचे दायित्व शासन आणि प्रशासन यांचेही आहे. तरी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना स्थानिक प्रशासनासह महिला आणि बाल कल्याण विभागाने विनामूल्य मास्क उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेश गावडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासन यांच्याकडे केली आहे. या वेळी सचिव बाळासाहेब उबाळे, प्रा. एम्.टी. पाटील, कोषाध्यक्ष सतीश वडणगेकर उपस्थित होते.