जून मासामध्ये कोरोना लसींचे १२ कोटी डोस उपलब्ध होणार ! – केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी देहली – जून मासामध्ये देशात लसींचे १२ कोटी डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ‘देशात तिसर्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला १ मे पासून प्रारंभ झाला आहे. देशात २९ मेपर्यंत २० कोटी ८६ लाख लसींचे डोस दिले गेले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथे अजूनही १ कोटी ८२ लाख डोस उपलब्ध आहेत’, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. तसेच पुढच्या ३ दिवसांत ४ लाखांहून अधिक डोस मिळतील, असे सांगण्यात आले आहे. देशात कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड आणि स्पुटनिक व्ही या लसी उपलब्ध आहेत.