‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नाही, तर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याला विरोध का ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

‘लव्ह जिहाद’चे दूरगामी प्राणघातक परिणाम !’ या विषयावर विशेष मुलाखत

हिंदूंच्या न्याय्य अधिकारांसाठी लढणारी अधिवक्त्यांची संघटना  हिंदु विधीज्ञ परिषद

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – विविध प्रकारच्या ‘जिहाद’ प्रमाणेच ‘लव्ह जिहाद’ हेसुद्धा जिहाद्यांनी हिंदु समाजाविरोधात पुकारलेले युद्धच आहे. सामान्य घरातील हिंदु युवतींपासून क्रीडा क्षेत्र, चित्रपटसृष्टी आदी विविध क्षेत्रांतील अनेक हिंदु युवती आणि महिला आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या असून त्यांची फसवणूक झाली आहे, तसेच त्यांचे भयानक शोषणही होत आहे, याची अनेक उदाहरणे विविध माध्यमांतून समोर आली आहेत. ‘लव्ह जिहाद’मुळे मोठ्या प्रमाणात भारतातीलच नव्हे, तर भारताबाहेरील हिंदूंसहित शीख युवतींचेही धर्मांतर झाले असून हिंदु कुटुंबव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम होत आहे. सध्या उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथील सरकारांनी लव्ह जिहाद विरोधातील कायदा केला आहे. गुजरात सरकारही हा कायदा आणण्याच्या मार्गावर आहे. ‘लव्ह जिहाद अस्तिवात नाही’, असे जे म्हणतात, त्यांचा लव्ह जिहाद विरोधातील कायद्याला विरोध का आहे ? असा परखड प्रश्‍न ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. त्यांनी ‘केंद्र सरकारनेही लव्ह जिहाद विरोधातील कायदा आणून त्याची योग्य कार्यवाही करावी’, अशी मागणी केली. विदेशातील ज्येष्ठ पत्रकार मीना दास नारायण यांनी ‘कॅनडीड मीना’ या त्यांच्या प्रसिद्ध ‘यू ट्यूब वाहिनी’वर अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांची ‘लव्ह जिहादचे दूरगामी प्राणघातक परिणाम !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मीना दास नारायण यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी दिली. ही मुलाखत १ सहस्र १०० हून अधिक जणांनी पाहिली. या मुलाखतीवर अनेकांनी ‘अशा मुलाखती वारंवार व्हायला हव्यात’, असे सांगितले.

या कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु युवती अन् महिला यांचे धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’ला युवती बळी न पडण्यासाठी पालकांचे दायित्व आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता, चित्रपटांतून ‘लव्ह जिहाद’ला दिले जाणारे प्रोत्साहन, धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता आदी विषयांशी संबंधित दर्शकांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे शंकानिरसन करण्यात आले.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मुलाखतीत मांडलेली उद्बोधक सूत्रे

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

धर्मांध आणि साम्यवादी यांची दुट्टपी भूमिका समजून घेणे आवश्यक !

ज्या वेळी ‘लव्ह जिहाद’च्या धोक्याविषयी हिंदु बांधव सांगतात, तेव्हा ‘लग्न करणारी हिंदु युवती आणि मुसलमान युवक यांनी कुणाशी विवाह करायचा, हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे’, असा युक्तीवाद मुसलमान अन् निधर्मी विचारसरणीचे लोक करतात; मात्र जेव्हा ‘समान नागरी कायदा’, ‘गोहत्या रोखणे’, असे अनेक विषय येतात. तेव्हा मुसलमान आणि निधर्मी राज्यघटनेची भाषा पुढे करून ‘हिंदूंनी अल्पसंख्यांकांच्या भावनांचा विचार करावा’, असा आग्रह करतात. एकंदरीत हिंदूंच्या भावनांचा कुठेच विचार केला जात नाही आणि सोयीस्कररित्या विषय पालटला जातो.

धर्मांध आणि साम्यवादी यांची वरील प्रकारची दुट्टपी भूमिका हिंदूंनी समजून घ्यायला हवी. जेव्हा हिंदू त्यांच्या धार्मिक भावनांविषयी बोलतात, तेव्हा धर्मांध आणि साम्यवादी लोक राज्यघटनेविषयी बोलतात. जेव्हा हिंदू समान नागरी कायद्याविषयी बोलतात, तेव्हा ते धार्मिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याविषयी बोलतात.

हिंदु युवतींना धोके लक्षात आणून देण्यासह त्यांना धर्मशिक्षण द्यायला हवे !

शरिया (इस्लामी) कायद्यानुसार मुसलमान परिवारात विवाहानंतर धर्मांतरित झालेल्या हिंदु महिलांना संपत्ती आणि अन्य कोणतेच अधिकार मिळत नाहीत; मात्र हिंदु कायद्यात विवाहानंतर हिंदु महिलांना अनेक अधिकार आहेत. या आणि अशा स्वरूपाच्या जाचांविषयी जागृती व्हायला हवी. हिंदु युवतींनी यांसारखे विविध धोके लक्षात घ्यावेत आणि धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करावे.

‘लव्ह जिहाद’विषयी इस्लामची शिकवण

इस्लामची शिकवणच जिहादला प्रोत्साहन देणारी आहे. सर्वत्र इस्लामचे राज्य असायला हवे. ‘दारूल हरब’ आणि ‘दारूल इस्लाम’ ही इस्लामची व्याख्या सर्वश्रुत आहे. ‘लव्ह जिहाद’ हा याच शिकवणीचा भाग आहे. ‘इसिस’मध्ये सहभागी होणार्‍या महिला लव्ह जिहादला बळी पडलेल्या महिला होत्या. धर्मांध महिलाही हिंदु मुलांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे धर्मांतर करतात. अशा घटना घडल्या आहेत.

हिंदु मुलींना अडकवण्यासाठी धर्मांध वापरत असलेल्या क्लृप्त्या

लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये ३ प्रकारे हिंदु मुलींना अडकवले जाते. हिंदु मुलींच्या भावनिकतेचा अपलाभ घेतला जातो. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या फसव्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन केले जाते. चित्रपटसृष्टीही लव्ह जिहादला प्रोत्साहन देऊन हिंदु मुलींचा बुद्धीभेद करते. काही वेळा मुलीच्या मित्र-मैत्रिणींच्या ओळखीतून धर्मांध तिचा भ्रमणभाष क्रमांक मिळवतात. त्यावर संदेश पाठवतात आणि नंतर बोलण्याचा प्रयत्न करून प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवतात.

काही औषधांच्या माध्यमातून हिंदु मुलींच्या वशीकरणाचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. यावर उपाय म्हणजे आताच्या पिढीला धर्मशिक्षण द्यायला हवे. असे केल्यास धर्माभिमानी हिंदु मुली कोणत्याही फसव्या गोष्टींना बळी पडणार नाहीत.

लव्ह जिहादच्या प्रकरणांत महिलांची भूमिका महत्त्वाची !

केवळ सामान्य महिला नव्हे, तर हिंदु अभिनेत्री, हिंदु कलाकार महिला यांनाही लव्ह जिहादला बळी पडावे लागले आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांत महिलांनी जर सांगितले की, तिचा छळ झाला किंवा तिला बलपूर्वक धर्मांतरित करण्यात आले, तर धर्मांध पतीला ‘लव्ह जिहाद’ झाला नसल्याचे सिद्ध करावे लागते.

इस्लामी संस्था आणि इस्लामी प्रवक्ते दायित्व घेणार का ?

एका हिंदु मुलीने मुसलमान मुलाशी विवाह केल्यास तिचा कसलाही छळ आणि तिच्यावर बळजोरी होणार नाही, याचे दायित्व इस्लामी संस्था अन् इस्लामी प्रवक्ते यांनी घ्यायला हवे. असे का होत नाही ? सेक्युलर (निधर्मी) असल्याचा पुरावा देण्याचे कर्तव्य केवळ हिंदूंच्याच माथी का ? सर्वांसाठी एकच न्याय असायला हवा.

‘विशेष विवाह कायदा’ देशभर लागू करा !

‘स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट’नुसार (‘विशेष विवाह कायद्या’नुसार) आंतरधर्मीय विवाह होत असल्याची प्रसिद्धी करावी लागते आणि मग विवाह होतो. या तरतुदीविरोधात याचिका प्रविष्ट केलेल्या आहेत. अशा याचिकांना विरोध करायला हवा. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी असे अनेक कायदे झाले आहेत. याचा हिंदूंना लाभ होत आहे. असे कायदे देशभर लागू व्हायला हवेत.

लव्ह जिहादच्या विरोधात विविध स्तरांवर लढा द्या !

लव्ह जिहाद झाल्याच्या प्रकरणांना स्वतःहून समोर आणायला हवे. यात प्रतिमा जपण्यासारखी किंवा लज्जेची गोष्ट नाही. अशा घटना जितक्या प्रकाशात येतील, तितके हिंदूंचे आघातांपासून रक्षण करता येईल. सरकारला पत्रे लिहिणे, स्थानिक आमदार-खासदार यांच्या समवेत लव्ह जिहादच्या विरोधात आवाज उठवण्याची मागणी करणे, हिंदूंनी लव्ह जिहाद प्रकरणांच्या विरोधात वैयक्तिक याचिका करणे, या माध्यमांतून हिंदू निश्‍चितच लढा देऊन जिंकू शकतात.