मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणार्याला अटक
मुंबई – मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणार्या सागर मंदेरा या युवकाला नागपूर येथून पोलिसांनी कह्यात घेतले आहे. तो मतीमंद असल्याचे सांगितले जात आहे. ३० मे या दिवशी दुपारी मंत्रालयाच्या आपत्कालीन कक्षात दूरभाष करून त्याने ही धमकी दिली होती. यानंतर बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने मंत्रालय अन् मंत्रालयाचा परिसर यांमध्ये कसून पडताळणी केली; मात्र संशयास्पद कोणतीही वस्तू आढळलेली नाही. प्राथमिक अनुमानानुसार ही अफवा असल्याचे समोर आले आहे.