मराठवाड्यातील ४०० बालरोगतज्ञ कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत काम करणार !

बीड, बुलढाणा, हिंगोली येथील बालरोगतज्ञांना दिले प्रशिक्षण !

प्रतिकात्मक छायाचित्र

हिंगोली – कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत बालकांवर परिणाम होण्याची शक्यता पहाता मराठवाड्यातील ४०० हून अधिक बालरोगतज्ञ प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाला साहाय्य करणार आहेत. त्यासाठी भारतीय बालरोगतज्ञ संघटनेने सिद्धता केली आहे. बीड, बुलढाणा आणि हिंगोली जिल्ह्यांतील बालरोगतज्ञांसाठी नुकतेच २ दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले.

‘मिशन कोविन उदय’ संकल्पना राबवणार !

‘बालरोगतज्ञ संघटनेकडून ‘मिशन कोविन उदय’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय बालरोगतज्ञांकडून माहिती दिली जात असून संभाव्य नियोजन केले जात आहे. या आपत्तीच्या काळात पूर्ण क्षमतेने संघटना प्रशासनाच्या बरोबरीने काम करणार आहे. त्या संदर्भात ३१ मे या दिवशी राज्याची बैठक होणार आहे.’ – डॉ. स्नेहल नगरे, जिल्हाध्यक्ष, बालरोगतज्ञ संघटना, हिंगोली.