सर्वच वैद्यकीय देयकांचे लेखापरीक्षण केले जाणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
शासनाने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. असे लेखा परीक्षण नियमित झाल्यास रुग्णालयांकडून पुन्हा अधिक देयके आकारली जाणार नाहीत. या निर्णयाची व्यवस्थित कार्यवाही होण्याकडेही लक्ष द्यावे, ही अपेक्षा.
पुणे – कोरोनाच्या काळात रुग्णालयांकडून जास्त रकमेची वैद्यकीय देयके आकारल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णांची लूट थांबवण्यासाठी रुग्णालयांकडून देण्यात येणार्या प्रत्येक वैद्यकीय देयकाचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यापूर्वी दीड लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय देयकांचे लेखापरीक्षण केले जात होते; मात्र आता सरसकट सर्वच देयकांचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षक नेमण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. आतापर्यंत पुण्यात रुग्णालयांनी घेतलेल्या वैद्यकीय देयकांच्या रकमेपैकी अंदाजे ९ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.