देहलीत तिसर्या लाटेत प्रतिदिन ४५ सहस्र जण बाधित होतील ! – आयआयटी देहली
नवी देहली – शहरात पुढील काळात येणार्या कोरोनाच्या तिसर्या लाटेमध्ये प्रतिदिन ४५ सहस्र रुग्ण सापडू शकतात, असे आयआयटी देहलीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. यांतील ९ सहस्र लोकांना प्रतिदिन रुग्णालयात भरती करावे लागेल. यासाठी देहलीने सिद्ध रहायला हवे. या काळात शहरातील रुग्णालयांना प्रतिदिन ९४४ मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासेल, असेही यात म्हटले आहे.
आईआईटी दिल्ली की AAP सरकार को चेतावनी#IITDelhi #Delhi #AAP #ArvindKejriwal https://t.co/FfgQh0Iwa1
— Zee News (@ZeeNews) May 29, 2021