९ लाख चाचण्यांपैकी केवळ ०.२ टक्के अहवालच पॉझिटिव्ह ! – पोलीस महानिरीक्षकांची माहिती
हरिद्वार कुंभमेळ्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा दावा खोटा !
कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेत संसर्गात वाढ झाली, अशी बेंबीच्या देठापासून ओरड करणारे किती खोटरडे आहेत, हेच या माहितीवरून पुन्हा एकदा उघड झाले ! आता हे हिंदुद्वेषी तोंड उघडतील का ?
हरिद्वार (उत्तराखंड) – येथे १ जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीत कोरोनाच्या संदर्भात एकूण ८ लाख ९१ सहस्र आर्.टी.पी.सी.आर्. चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामधील १ सहस्र ९५४ चाचण्या (०.२ टक्के) पॉझिटिव्ह आल्या. कुंभमेळ्यासाठी १६ सहस्र पोलिसांना तैनात करण्यात आले होते. ३० एप्रिलपर्यंत यांमधील केवळ ८८ म्हणजेच ०.५ टक्के पोलीस कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली. १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत ५५ लाख ५५ सहस्र ८९३ कर्मचार्यांचे स्वॅब घेतले होते, यामधील १७ सहस्र ३३३ पॉझिटिव्ह आले होते. यामुळे हरिद्वार कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढला, असे म्हणता येणार नाही, अशी माहिती कुंभमेळ्याच्या सुरक्षेचे दायित्व असणारे पोलीस महानिरीक्षक संजय गुंजयाल यांनी दिली.
संजय गुंजयाल म्हणाले की, १ एप्रिल या दिवशी कुंभमेळ्याला प्रारंभ झाला, तेव्हा महाराष्ट्र, हरियाणा यांसारख्या राज्यांत कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णसंख्या वाढत होती. जर आपण हरिद्वार जिल्ह्याची १ जानेवारी ते ३० एप्रिलला कुंभमेळा संपेपर्यंतची कोरोना रुग्णांची माहिती पाहिली, तर कुंभमेळ्याला कोरोनाचा संसर्ग वाढवण्यासाठी उत्तरदायी धरण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे लक्षात येते.