पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांच्या देहत्यागानंतर ११ व्या दिवशी छापून आलेल्या छायाचित्राकडे पाहून संत आणि साधक यांना आलेल्या अनुभूती
दैनिकातील पृष्ठ क्र. १ वर दिलेल्या सूक्ष्मातील प्रयोगाचे उत्तर
११.५.२०२१ या दिवशी पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांनी देहत्याग केल्यानंतर ११ व्या (२१.५.२०२१ या) दिवशी त्यांच्याविषयीचे लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आले होते. त्या लिखाणातील छायाचित्राकडे पाहून संत आणि साधक यांना पुढील अनुभूती आल्या.
१. ‘पू. माईणकरआजी यांच्या आज्ञाचक्राकडे पाहिल्यावर ध्यान लागते. माझा ‘निर्विचार’ हा नामजप आपोआप होऊ लागला.’
– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन-विभाग समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (२१.५.२०२१)
२. कै. (पू.) शालिनी माईणकरआजी यांचे छायाचित्र पाहून जिवंतपणा जाणवणे
अ. ‘पू. माईणकरआजी यांच्या छायाचित्राकडे बघून पुष्कळ जिवंतपणा जाणवला आणि ‘त्यांनी देहत्याग केलेलाच नाही’, असे वाटले.’ – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०२१)
आ. ‘पू. आजींच्या ओठांकडे पाहिल्यावर त्यांची हालचाल होतांना जाणवते आणि मनाला आनंद होतो.’ – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०२१)
३. कै. (पू.) शालिनी माईणकरआजी यांचे छायाचित्र पाहून आनंद जाणवणे
अ. ‘त्यांच्याकडून पुष्कळ थंडावा आणि आनंद प्रक्षेपित होत होता.’ – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (२१.५.२०२१)
आ. ‘पू. आजींच्या मुखाकडे पाहिल्यावर मनाला आनंद जाणवतो आणि नंतर मन निर्विचार होऊन शांती जाणवते. ‘त्यांच्या वाणीतून त्या इतरांना सतत आनंद देतात’, असे जाणवते.’
– कु. मधुरा भोसले (२२.५.२०२१)
४. कै. (पू.) शालिनी माईणकरआजी यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर स्वतःच्या देहामध्ये पालट होत असल्याचे जाणवणे
४ अ. कै. (पू.) शालिनी माईणकरआजी यांच्यामध्ये अस्तित्व विरून गेल्याचे जाणवणे : ‘त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केल्यावर ‘मी त्यांच्यात सामावला गेलो आहे’, असे जाणवले, तसेच माझे अस्तित्व नाहीसे झाले. ही त्यांच्यातील व्यापकतेची अनुभूती मला मिळाली.’ – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (२१.५.२०२१)
४ आ. ‘पू. माईणकरआजी यांच्या तोंडवळ्याकडे पाहून आपला देह शुद्ध आणि निर्मळ होत आहे’, असे जाणवते.’ – कु. प्रियांका लोटलीकर (२१.५.२०२१)
५. कै. (पू.) माईणकरआजींकडून निर्गुण चैतन्याचे प्रक्षेपण होत असल्याचे जाणवणे
५ अ. ‘त्यांच्याकडून निर्गुण चैतन्याच्या पांढर्या किरणांचे प्रक्षेपण होते. त्यामुळे संपूर्ण वातावरणाची शुद्धी होते.’ – कु. मधुरा भोसले (२२.५.२०२१)
५ आ. पू. आजींची पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांद्वारे होणार्या चैतन्याचे प्रक्षेपण वाढल्यामुळे त्यांच्या मुखाच्या पेशीपेशींतून निर्गुण चैतन्याचे सूक्ष्म किरण सर्वत्र प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे : ‘त्यांच्या मुखातून वातावरणात निर्गुण चैतन्याचे प्रक्षेपण होते. पंचज्ञानेंद्रियांपैकी त्यांच्या डोळ्यांतून चैतन्याचे प्रक्षेपण सर्वाधिक प्रमाणात होत आहे. ‘त्यांची पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांद्वारे होणार्या चैतन्याचे प्रक्षेपण वाढल्यामुळे त्यांच्या मुखाच्या पेशीपेशींतून निर्गुण चैतन्याचे सूक्ष्म किरण सर्वत्र प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवते.’- कु. प्रियांका लोटलीकर (२१.५.२०२१)
६. कै. (पू.) आजींनी निर्गुण अवस्था गाठल्याचे जाणवणे
६ अ. कै. (पू.) आजींच्या मुखााकडे एकटक पाहिल्यावर तेथे निर्वात पोकळी असल्याप्रमाणे जाणवणे : ‘पू. आजी देहात नसल्याप्रमाणे वाटते. त्यांच्या मुखाकडे एकटक पाहिल्यावर तेथे निर्वात पोकळी असल्याप्रमाणे जाणवते. ‘त्या उच्चतम निर्गुण अवस्था अनुभवत असूनही सहजावस्थेत वावरतात’, असे जाणवले. पू. आजींच्या निर्गुण अवस्थेमुळे त्यांच्या स्थूलदेहातील पृथ्वीतत्त्व न्यून होऊन तेज आणि वायु ही तत्त्वे वाढली होती. त्यामुळे त्यांचा स्थूलदेह जड न वाटता, हलका वाटत होता.’ – कु. मधुरा भोसले (२२.५.२०२१)
६ आ. ‘त्यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर त्यांच्या देहाच्या कडा अस्पष्ट झाल्या असून, त्या चैतन्यात विलीन होत असल्याचे जाणवते.’- कु. प्रियांका लोटलीकर (२१.५.२०२१)
७. कै. (पू.) आजींच्या देहत्यागानंतर घेतलेल्या दर्शनाच्या वेळी आणि देहत्यागानंतर ११ व्या दिवशी छायाचित्राकडे बघून जाणवलेली त्यांच्यातील स्पंदने
वरील सारणीतून लक्षात येते, ‘आता कै. (पू.) माईणकर आजी यांच्याकडून आनंदाची स्पंदने पुष्कळ अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत आहेत.’ – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (२१.५.२०२१)
८. कै. (पू.) शालिनी माईणकरआजी यांचे छायाचित्र पाहून कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अन्य अनुभूती
८ अ. कै. (पू.) शालिनी माईणकरआजी यांचे डोळे शून्यात स्थिरावले असल्याचे जाणवणे : ‘पू. आजींच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर प्रथम भाव जाणवतो. तेव्हा त्यांची बुबुळे सूक्ष्मातून निळ्या रंगाची दिसतात. डोळ्यांकडे सलग पाहिल्यावर ‘त्यांचे डोळे शून्यात स्थिरावले आहेत’, असे जाणवते.
८ आ. कै. (पू.) आजींच्या डोक्याभोवती दिव्य प्रभावळ दिसणे : ज्याप्रमाणे देवतांच्या डोक्याभोवती दिव्य प्रभावळ दिसते, त्याप्रमाणे पू. आजींच्या मुखाच्या मागे पिवळसर पांढर्या रंगाची प्रभावळ गोल फिरतांना दिसली. यावरून त्यांच्या दिव्यत्वाची अनुभूती आली.’ – कु. मधुरा भोसले (२२.५.२०२१)
|