पाकच्या राज्यघटनेत धार्मिक अल्पसंख्यांकांचा उल्लेख ‘मुसलमानेतर’ असा करा ! – पाकिस्तानमधील एका हिंदु खासदाराची मागणी
घटना दुरुस्तीसाठी पाकच्या संसदेत खासगी विधेयक सादर
असे केल्याने जिहादी वृत्तीच्या पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार कदापि थांबणार नाहीत. यासाठी आता भारत सरकारनेच पुढाकार घेऊन तेथील हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारले पाहिजे !
इस्लामाबाद – पाकच्या राज्यघटनेत धार्मिक अल्पसंख्यांकांचा उल्लेख ‘मुसलमानेतर’ असा करावा, अशी मागणी पाकिस्तानमधील हिंदु खासदार किसो मल कीआल दास यांनी केली आहे. यासाठी त्यांनी पाकच्या संसदेत अशासकीय विधेयकही सादर केले आहे. दास हे विरोधी पक्ष असलेल्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ (पीएम्एल्-एन्) या पक्षाचे खासदार आहेत.
पाकिस्तानमधील हिंदूना हवाय ‘हा’ दर्जा; घटना दुरुस्तीसाठी खासगी विधेयक सादरhttps://t.co/TlPOMkddfP#Pakistan #Hindu #HinduinPakistan #minority
— Maharashtra Times (@mataonline) May 29, 2021
दास यांनी पुढे म्हटले आहे की, राज्यघटनेत अशा प्रकारे पालट केल्यास पाकमधील मुसलमानेतर धर्मियांशी केला जाणारा भेदभाव संपुष्टात येऊन प्रत्येक नागरिकाला समानता आणि न्याय सुनिश्चित केला जाऊ शकतो. या विधेयकाला तात्काळ संमती देऊन त्याची कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. सरकारने या विधेयकाला विरोध केलेला नाही. हे विधेयक संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्यात आले आहे. समितीकडून या विधेयकाची समीक्षा केल्यानंतर या विधेयकावर मतदान घेण्यात येईल.
पाकिस्तानमध्ये आता केवळ ७५ लाख हिंदू शेष !
हिंदूंविरुद्ध सतत गरळओक करणारे पुरोगामी, साम्यवादी, काँग्रेसी याविषयी एक शब्दही बोलत नाही, हे लक्षात घ्या आणि सर्वत्रच्या हिंदूंच्या रक्षणासाठी आता तरी हिंदु राष्ट्र स्थापन करा !
पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी मुसलमानेतर समुदायांची लोकसंख्या अनुमाने ३.५ टक्के आहे. यामध्ये ख्रिस्ती, अहमदी, बहाई, पारशी, बौद्ध आदी समुदायांचा समावेश आहे. यामध्येही हिंदु समुदाय सर्वांत मोठा ‘अल्पसंख्य समुदाय’ आहे. अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये ७५ लाख हिंदू शेष आहेत. तेथे सर्वाधिक हिंदू सिंध प्रांतात आहेत.